पनवेल पालिका कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीत बहुजन विकास पॅनलचे १४ पैकी १३ विजयी.

पनवेल पालिका कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीत बहुजन विकास पॅनलचे १४ पैकी १३ विजयी.

पनवेल/ प्रतिनिधी :-
पनवेल महानगर पालिका पगारदार नोकरांची सहकारी पतसंस्था मर्यादित पनवेल यांची २०२२ ते २०२७ या कालावधी करिता पंच वार्षिक निवडणूक शनिवार दिनांक २४/१२/२०२२ रोजी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली,सदर निवडणुकीमध्ये राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या मार्गदर्शनाखाली बहुजन विकास पॅनल ने आपले धडाडीचे १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते त्या पैकी सर्वसाधारण मतदार संघातील १० पैकी १०.महिला राखीव मतदार संघातून २ पैकी २. तसेच इतर मागासवर्ग मतदार संघातून १ पैकी १.असे एकूण १३उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले आहेत तसेच भटक्या विमुक्त जाती जमाती या मतदार संघातून १ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
या कामी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे पनवेल विभागाचे अध्यक्ष शरद कांबळे,महासचिव सतिश चींडालिया,खजिनदार भावेश चंदने,पतसंस्थाचे माजी अध्यक्ष कैलास सोलंकी,तसेच संतोष सोनवणे,संतोष गायकवाड,रुपेश चीत्रुक,पतसंस्था चे माजी अध्यक्ष मनोहर गोंधळी,सागर खरारे,कुणाल साळवे, दिपक चव्हाण,निलेश सदावर्ते,अजय टाक,गुरुनाथ भगत, दिव्या टाक,राजेश डोंगरे,मनोज चव्हाण,मनोज गायकवाड,संजय किसन जाधव,संजय शिवराम कांबळे,अरुण चिंतामण कांबळे,विकी परमार, दिपक बागडी,धर्मेंद्र पारचे,अमित पार्चे, रवि गायकवाड,मनोज कांबळे,रुचिरा साळवे,सुरेखा गायकवाड,सायली कांबळे,सुवर्णा गायकवाड, सुवर्णा चव्हाण,नरेश बहोत,सुरेश लिडलॉन,सुभाष धिंग्या,रवि बैद,संजय मोहिते,विष्णू जाधव,संतोष चितळे,योगेश मंजुळे,दिनेश बाबरे,निलेश बाबरे,धनराज पवार यांनी विशेष परिश्रम घेऊन १५ पैकी १४ जागांवर विजय संपादन करून घवघवीत यश मिळवले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *