भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते श्री बबन बारगजे यांची भारतीय जनता पार्टीच्या भटके विमुक्त आघाडीच्या उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाली

*बबन बारगजे यांना नियुक्ती पत्र प्रदान* भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते श्री बबन बारगजे यांची भारतीय जनता पार्टीच्या भटके विमुक्त आघाडीच्या उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाली .

आज दि.०२ ऑक्टोबर रोजी पनवेलच्या मार्केट यार्ड येथील रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहामध्ये महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले . योग्य पदाला योग्य न्याय देणारी व्यक्ती म्हणून बबन बारगजे यांची ओळख आहे . त्याचमुळे सलग तिसऱ्यांदा त्यांची निवड झाली त्याबद्दल सर्वांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले . यावेळी पनवेल चे आमदार माननीय प्रशांत ठाकूर , पदवीधर मतदारसंघाचे आमदार ऍड निरंजन डावखरे , शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा कोकण प्रभारी श्री अतुल काळसेकर जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी व अनेक मान्यवर उपस्थित होते .

One thought on “भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते श्री बबन बारगजे यांची भारतीय जनता पार्टीच्या भटके विमुक्त आघाडीच्या उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाली”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *