स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी युथ रिपब्लिकन मुंबई प्रदेश च्या वतीने स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा एक दिवसीय मेळावा ठकुभाऊ संसारे हॉल वडाळा येथे संपन्न झाला . मेळाव्याच्या सुरुवातीला सर्वप्रथम दादर येथील चैत्यभूमी येथे पक्षाच्या सर्व राष्ट्रीय कार्यकारणीतील नेत्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास भेट देऊन तेथे अभिवादन केले . त्यानंतर मेळाव्याला पक्षाचे अध्यक्ष सागर भाई संसारे व युवा नेते अनिकेत संसारे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी पक्षाचे महाराष्ट्राचे संघटक भगवान गरुड मुंबईचे नेते अरुण जाधव रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष महेश साळुंखे नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख अरुण धीवर इत्यादी मान्यवर नेते उपस्थित होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन सहा डिसेंबर रोजी चैत्यभूमी येथे संपन्न होतो या कार्यक्रमाकरिता उपस्थित सर्व भीम भक्तांचे नियोजन करण्याच्या विषयी चर्चा करण्यात आली . त्याचप्रमाणे एक जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे सर्व भीमसैनिक हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात त्याविषयी सुद्धा कार्यक्रमाच्या नियोजनाविषयी चर्चा करण्यात आली. तसेच जानेवारी 2024 रोजी रायगड जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांचा मेळावा महेश साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली जेष्ठ नागरिक हॉल पनवेल येथे आयोजित करण्यात येणार आहे त्याविषयी सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा एक दिवसीय मेळावा
