आज पनवेल येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा समाजातील काही युवकांनी एक दिवसीय उपोषण पनवेल येथे संपन्न केले. या उपोषणाला स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी पाठिंबा दर्शविला . त्याचबरोबर भीमशक्ती संघटना राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांच्या वतीने सुद्धा पाठिंबा दर्शविण्यात आला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी यांच्यावतीने अध्यक्ष भय्यासाहेब ईंदिसे यांनी सुद्धा मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविला आहे . त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिकचे अध्यक्ष कनिष्क कांबळे यांनी सुद्धा या उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे . त्याचबरोबर राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आण्णासाहेब कटारे यांनी सुद्धा पाठिंबा दर्शवला आहे . या उपोषणात गणेश कडू, विनोद चव्हाण, प्रवीण पोपटा इत्यादी युवक सहभागी झाले आहेत.
पनवेल येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा समाजातील काही युवकांनी एक दिवसीय उपोषण
