पनवेल / प्रतिनिधी :-
बोरले येथे 12 दिवसापासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या पार्श्वभूमीवर
आज प्रांत कार्यालय पनवेल येथे बैठक संपन्न झाली.
विरार-अलिबाग कॉरिडोर रस्त्यात बाधित असणारी सांगडे,बोरले बेलवली ,पाली खुर्द या गावांचां गेली 12 दिवसापासून उपोषण सुरू आहे.
कोणत्याही परिस्थितीमध्ये आमची घरे देणार नाही ही स्पष्ट भूमिका शेतकऱ्यांनी ठेवलेली आहे.
या बैठकीला शासन स्तरावरून अधिकारी वर्ग हजर होता.
शेतकऱ्यांनी खरंतर आमची घरे जाऊ नये हीच भूमिका मांडली आणि अगदी अपरिहार्य कारणाने जर घर जाणार असतील तर एअरपोर्ट प्रकल्पग्रस्तांना मिळालेल्या पॅकेजपेक्षा जास्त पॅकेज मिळाव हे खडसाऊन सांगितलं.
*शासनाच्या वतीने राहुल मुंडके यांनी कॉरिडोर रस्त्यातील अलाइनमेंट बाबत पुनर्विचार करण्याचे सांगितले* *दोन-तीन दिवसांमध्येच यावर अभ्यास करून एक प्लॅन तयार केला जाईल* आणि तो शेतकऱ्यांसमोर मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
त्याचबरोबर गेली 12 दिवसापासून सुरू असलेल्या उपोषण आपण सोडावा अशी विनंती केली मात्र *आपले शब्द फक्त आश्वासन नको तर ते लेखी स्वरूपामध्ये मिळावे असे स्पष्ट शेतकऱ्यांनी सांगितले.* या बैठकीला मोठ्या प्रमाणामध्ये महिला भगिनी देखील हजर होत्या.
या बैठकीसाठी आर्किटेक्ट श्री अतुल म्हात्रे, एडवोकेट सुरेश ठाकूर, नैना प्रकल्पवादी शेतकरी उत्कर्ष समितीचे अध्यक्ष वामन शेठ शेळके, सचिव श्री राजेश केणी, पर्यावरणाचे अभ्यासक रानडे साहेब, कॉरिडोर च्या दृष्टीने विशेष मेहनत घेणारे सुरेशजी पवार, सहसचिव शेखरजी शेळके, एकनाथ पाटील, बाळाराम फडके ,घनश्याम पाटील बाळकृष्ण पाटील, गोविंद पाटील,अनिल भोपीं, बोरले, सांगडे , बेलवली,पालीखुर्द गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पनवेल प्रांत कार्यालयात शेतकरी आणि शासकीय अधिकाऱ्यांची बैठक संपन्न
