खारघर पत्रकार संघ,रजिस्टरचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब मगर संपादित “जनसभा” वृत्तपत्राच्या १३ व्या दीवाळी विशेषांकाचे प्रकाशन आज सकाळी ११ वाजता संपन्न झाले

“खारघर पत्रकार संघ,रजिस्टरचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब मगर संपादित “जनसभा” वृत्तपत्राच्या १३ व्या दीवाळी विशेषांकाचे प्रकाशन आज सकाळी ११ वाजता संपन्न झाले.

पनवेल नगरपरिषदेचे आदर्श माजी नगराध्यक्ष आणि संपूर्ण भारतातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक जे.एम.म्हात्रे यांच्या शुभहस्ते हे प्रकाशन झाले.याप्रसंगी पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सन्माननिय प्रितम म्हात्रे आणि माजी महिला व बाल कल्याण समिती सभापती सौ.लिना गरड यांनी “जनसभा”च्या दीवाळी विशेषांकाला आणि संपादक-आप्पासाहेब मगर यांना भरभरून शुभेच्छा दील्या.तसेच पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमांतून जनतेच्या समस्यांची सोडवणूक होण्यासाठी आवाज उठवीण्याचे आवाहन केले.
या प्रकाशन सोहळ्यासाठी नवी मुंबई पोलीस दलातील गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननिय अर्जुन गरड,खारघर काॕलनी फोरमचे समन्वयक आणि नवी मुंबईमधील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मधू पाटील,अॕड.बालेश भोजने,महाराष्ट्रातील इलेक्ट्राॕनिक प्रसार माध्यमांतील बहुचर्चित युवा चेहरा हर्षलजी भदाने-पाटील,महालक्ष्मी हौसिंग सोसायटी खारघर सेक्टर-१५ चे संस्थापक शिवराम परब,नवी मुंबईतील मुद्रीत शोधन क्षेत्रात अव्वल दर्जाचे काम करणारे सनी चव्हाण,वरिष्ठ पत्रकार रत्नाकर पाटील,रायगड सम्राटचे संपादक शंकर वायदंडे,पनवेलमधील नामांकीत क्षितीज पर्व या वृत्तवाहीनीचे संपादक सनिप कलोते,खारघर पत्रकार संघाचे खजिनदार संदेश सोनमळे आणि युवा पत्रकार मयूर बर्वे आवर्जून उपस्थित राहीले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *