दर्जेदार साहित्य, बातम्या हीच पनवेल युवा चि ओळख : आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल/प्रतिनिधी
संपादक निलेश सोनावणे हे आपल्या वर्तमान पत्राच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्न मांडत असतात आणि ते तडीस नेतात. दिवाळी अंकामध्ये दर्जेदार साहित्य आणि नियमित प्रकाशित होणार्या दर्जेदार बातम्या हीच पनवेल युवा ची ओळख आहे असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल युवा च्या सोळाव्या दिवाळी अंकाच्या प्रकाशन प्रसंगी केले.
निलेश सोनावणे संपादित पनवेल युवा दिवाळी अंकाचे प्रकाशन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की निलेश सोनावणे गेली वीस वर्षे सातत्याने पनवेल युवा हे वर्तमान पत्र चालवीत आहेत. अनेक समाजिक प्रश्न ते आपल्या वर्तमान पत्राच्या माध्यमातून मांडतात आणि ते तडीस नेतात, एखादा प्रश्न हाती घेतला का ती समस्या सुटेपर्यंत पाठपुरावा करतात.त्यांचे सामाजिक काम ही चांगले आहे. दिवाळी अंकाच्या माध्यमातून चांगले दर्जेदार साहित्य हीच पनवेल युवा ची ओळख असल्याचे ते यावेळी बोलले,
या प्रकाशन प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते गौतम पाटेकर, पत्रकार रविन्द्र गायकवाड, पत्रकार अनिल कुरघोडे ,पत्रकार शंकर वायदंडे,पत्रकार संतोष वाव्हल ,पत्रकार राजेंद्र कांबळे, पत्रकार रवींद्र चौधरी, प्रशांत
आवळे , उद्योजक मछिंद्र जाधव ,रा .जी. प. सदस्य अमित जाधव ,जागृती फॉउंडेशन संदेश पाटील ,कल्पेश कांबळे आदी मान्यवर उपस्तिथ होते .