*सॉफ्ट टेनिस रायगड जिल्हा संघ जाहीर*
महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस असोसिएशन अंतर्गत गोंदिया जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने ९ वी सब-ज्युनिअर गट राज्यस्तरीय मुले व मुली अजिंक्यपद स्पर्धा २४ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान गोंदिया येथे आयोजित करण्यात आली आहे. यासाठी रायगड जिल्ह्याचा सब-ज्युनिअर मुले व मुली संघ निवडण्यात आला आहे.
२ री जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस अजिंक्यपद स्पर्धा २०२३-२४ दिनांक १० सप्टेंबर रोजी नुकतेच खारघरमधील विश्वज्योत हायस्कूल व रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे उद्घाटन विश्वज्योत हायस्कूलच्या उपप्राचार्या वासंती स्वामी यांच्या हस्ते झाले. सदर स्पर्धेत रायगड जिल्हातील सर्व सॉफ्ट टेनिस खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचे बक्षीस वितरण भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक हर्षल बाबर व महासचिव सॉफ्ट टेनिस ऑफ महाराष्ट्र रवींद्र सोनावणे यांच्या हस्ते झाले.
या अजिक्यंपद स्पर्धेतून निवड झालेले प्राविण्यप्राप्त खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेत रायगड जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
सब-ज्युनिअर मुले – स्पर्श पाटील, शौर्य मुदलियार, रिषीकेश खानोलकर, देवेंद्र चव्हाण, मुनंग पवार, ध्रुव अढाव, राज बिस्वास, आशिष गोड, माधव मुदलियार, आदित्य कुमार
सब-ज्युनिअर मुली – इरा आयतान, साक्षी बोने, रिद्धी मडसे, सृष्टी धुरी, श्रिया कडाले, दीक्षा वलवे, श्रुती बोने