ॲडवोकेट दिनानिमित्त डॉ. विजय बेडेकर सर यांची विद्यार्थ्यांनी भेट घेतली

मुंबई/ प्रतिनिधी :-

रविवार दिनांक ३ डिसेंबर २०२३ रोजी “ॲडवोकेट दिनानिमित्त” विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त *डॉ. विजय बेडेकर सर* यांची विद्या प्रसारक मंडळाचे ठाणे महानगरपालिका विधी महाविद्यालयाचे *विद्यार्थी प्रतिनिधी शुभम सरंगुले* व इतर सहकारी विद्यार्थ्यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांच्यासमोर शैक्षणिक, सांस्कृतिक, कला , क्रीडा , वैज्ञानिक क्षेत्रातील कार्यक्रमांचा अहवाल सादर केला. तसेच विश्वस्तांना स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती *डॉ. राजेंद्र प्रसाद* यांचे छायाचित्र भेट केले. सोबतच संस्थेचे विश्वस्त आणि विद्यार्थी यांच्यातील नाते अधिक भक्कम व्हावे, याकरता दोघांच्यात ( बनावट ) करार करून अतिशय नावीन्यपूर्ण पद्धतीने, ” ॲडवोकेट डे” साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या विविध कार्यक्रमांचे त्यांनी कौतुक देखील केले. सदर कार्यक्रमास ॲडवोकेट क्षितिजा खांगटे तसेच विधी महाविद्यालयाचे ज्ञानेश्वरी शिंदे, पार्थ आडे, ऋतिका पेठकर, चिन्मय नाईक, अमन झा, सचिन मिश्रा, दिग्विजय पाटील हे विद्यार्थी उपस्थित होते.

त्याचबरोबर विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या *डॉ. श्रीविद्या जयकुमार* यांना देखील भेटवस्तू देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *