भाजपा उत्तर रायगड भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष बबन बारगजे यांच्या वाढदिवसानिमित्त आधार कार्ड व नवीन मतदार नोंदणी शिबिर संपन्न

दिनांक १५/१२/२३ रोजी कळंबोली सेक्टर 4 येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त व बबन बारगजे यांच्या वाढदिवसानिमित्त आधार कार्ड व नवीन मतदार नोंदणीचे शिबिर आयोजित करण्यात आले होते . या शिबिरास प्रचंड प्रतिसाद लाभला विभागातील अनेक नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली होती या शिबिरास भाजपाचे कळंबोली शहराध्यक्ष रविनाथ पाटील पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अमर पाटील जय गोपीनाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष आंधळे सचिव हनुमंत विघ्ने प्रतिष्ठानचे रायगड जिल्हाध्यक्ष किरण गीते कार्याध्यक्ष भगवान जायभाय , पप्पू सोनवणे , तुकाराम केदार इत्यादींनी भेट दिली . तसेच भाजपाचे भटके विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष श्री बबन बारगजे यांचा वाढदिवसही याच ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला . शिबिरास येणारे प्रत्येक शिबिरार्थी बबन बारगजे यांना धन्यवाद देत होते . आधार बाबत अनेक लोकांच्या समस्या आहेत काही लोकांचे मोबाईल नंबर लिंक नाहीत तर काही लोकांचे अपडेट नाही त्यामुळे असे शिबिर वारंवार आयोजित केले जावेत असे अनेक नागरिकांनी सांगितले . त्यामुळे बबन बारगजे यांनी शिबिराचे दिवस वाढवण्यासाठी मागणी केली . त्यासोबत नवीन मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली त्यामुळे नवीन मतदारांचा नाव नोंदविण्याचा उत्साह दिसून आला .

One thought on “भाजपा उत्तर रायगड भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष बबन बारगजे यांच्या वाढदिवसानिमित्त आधार कार्ड व नवीन मतदार नोंदणी शिबिर संपन्न”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *