सौ.प्राप्ती ठाकूर आगरी समाजातील पहिल्या महिला कमर्शियल पायलट

*सौ.प्राप्ती ठाकूर आगरी समाजातील पहिल्या महिला कमर्शियल पायलट*
प्रितम म्हात्रे यांनी केले अभिनंदन!”
सरला ठकराल या विमान उडवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत्या. १९३६ साली त्यांनी म्हणजेच २१व्या वर्षी दिल्लीतील फ्लाइंग क्लबमधून विमान चालवण्याचे त्यांनी प्रशिक्षण घेतले व विमानचालकाचे लायसन्स मिळवले. त्यानंतर त्यांनी एक जिप्सी मोथ जातीचे विमान सोलो उडवले. दुर्गा बॅनर्जी या भारतातील पहिल्या महिला व्यावसायिक पायलट आहेत. एअर सर्व्हे ऑफ इंडियामध्ये सामील झाल्यानंतर कॅप्टन दुर्गा बॅनर्जी यांनी 1956 मध्ये कलकत्ता येथे इंडियन एअरलाइन्समध्ये प्रवेश केला, जिथे त्या भारताच्या पहिल्या महिला व्यावसायिक पायलट बनल्या.
पनवेल परिसरात सुद्धा झपाट्याने विकास होत आहे त्यावेळेस येथील तरुण पिढी सुद्धा नवीन तंत्रज्ञान आणि शिक्षणामध्ये मागे नाही. श्री व सौ.रजनी भरत चांगू ठाकूर यांची सुकन्या आणि श्री. व सौ. योगिता दीपक ठाकूर यांची सून सौ. प्राप्ती राज ठाकूर या कमर्शियल पायलट बनून आगरी समाजातील पहिल्या महिला पायलट झाल्या त्याबद्दल पनवेल महानगरपालिकेचे मा.विरोधी पक्ष नेते श्री.प्रितम जे. म्हात्रे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोट
पनवेल मध्ये भविष्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट मध्ये पायलट सोबतच इतरही महत्त्वाच्या विभागात आपल्या परिसरातील महिला वर्गाला सुद्धा नोकरीच्या संधी आहेत. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर सौ. प्राप्ती राज ठाकूर यांना मिळालेल्या संधीतून भविष्यात पनवेल परिसरातील तरुणांना काम करण्यासाठी नक्कीच प्रेरणा मिळेल.:-
श्री.प्रितम जे. म्हात्रे
मा.विरोधी पक्ष नेते
(पनवेल महानगर पालिका)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *