नवीन पनवेलच्या के.आ.बांठीया विद्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत शालेय जीवनावर आधारित प्रयत्न लघुपटाचा शुभारंभ…

नवीन पनवेलच्या के.आ.बांठीया विद्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत शालेय जीवनावर आधारित प्रयत्न लघुपटाचा शुभारंभ…
विद्यालयातच शूटिंग आणि शिक्षक,विद्यार्थीच बनले कलाकार

पनवेल – सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या नवीन पनवेल येथील के.आ.बांठीया माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात आर्ट फॅक्टरी एन्टरटेन्मेंट पुणे निर्मित व स्व.दत्तात्रय व्ही.पवार (माजी प्राचार्य, बांठीया विद्यालय ) यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या प्रेषित द.पवार यांनी दिग्दर्शित केलेल्या “प्रयत्न” या शालेय जीवनावर आधारित लघुपटाचे श्रीवर्धन पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला.

प्रसंगी सुएसोचे संचालक कलंबोली विद्यालयाचे प्राचार्य आर.बी.पालवे यांनी,प्रयत्नाचा प्रयत्न यशस्वी झाला असून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.बांठीया विद्यालयाचे प्राचार्य बी.एस.माळी यांनी प्रयत्न या लघुपटाचे चित्रीकरण बांठीया शाळेत झाले असून यामध्ये असलेले कलाकार हे बांठीया शाळेतील शिक्षक व विद्यार्थी आहेत या लघुपटाचे कथानक शालेय जीवनात मस्ती करणारे व अभ्यासाकडे दुर्लक्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल करण्यासाठी प्रेरणादायी आहे असे मत मांडले आगरी शिक्षण संस्थेचे प्राचार्य पंकज भगत यांनी लघुपटाला शुभेच्छा दिल्या.

या लघुपटात एन.एन.पालीवाला ज्युनियर कॉलेजचे प्रा.अजिनाथ बाबासाहेब गाडेकर हे सह कलाकार असून एन.एन. पालीवाला ज्युनियर कॉलेजचे माजी विद्यार्थी हे या लघुचित्रपटात कलाकार आहेत गटशिक्षणाधिकारी यांनी लघुचित्रपटाच्या उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी व शैक्षणिक सकारात्मक अशा कलाकृतीची निर्मिती होणे ही काळाची गरज आहे असे मत मांडून लघुपटाला शुभेच्छा दिल्या व महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभाग (मंत्रालय) यांनी प्रयत्न हा लघुचित्रपट महाराष्ट्रातील संपूर्ण शाळांमध्ये दाखविण्याची परवानगी देण्यात आली आहे.

उद्घाटन प्रसंगी उर्दू हायस्कूल, आपटा मुख्याध्यापक के.एस.
अंतुले,याकूब बेग हायस्कूल पनवेल प्राचार्य एस.के पटेल, ऍडव्होकेट केशव धेंडे,पुणे, कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी,सद्गुरु वामन बाबा विद्यालय घोट प्राचार्य संदेश पाटील,आर्ट फॅक्टरी एन्टरटेन्मेंट पुणे अमर घाटे तसेच ध्येयार्थ युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष सुर्वे, दिग्दर्शक प्रेषित द.पवार (माजी विद्यार्थी) एन.एन.पालीवाला ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी व प्राध्यापक वृंद उपस्थित होते.

हा कार्यक्रम चित्रपटाच्या यशस्वी पणे पार पाडण्यासाठी सुएसोचे सांस्कृतिक विभागाचे प्रमुख व सहकारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *