खारकोपर आणि बामणडोंगरी रेल्वे स्थानकात शौचालय सुरू* “शेकाप नेते प्रितम जनार्दन म्हात्रेंचा यशस्वी पाठपुरावा”

*खारकोपर आणि बामणडोंगरी रेल्वे स्थानकात शौचालय सुरू*
“शेकाप नेते प्रितम जनार्दन म्हात्रेंचा यशस्वी पाठपुरावा”


उरण /प्रतिनिधी :-
गेल्या वर्षभरापासून सिडको आणि रेल्वे प्रशासन यांच्यात बामणडोंगरी आणि खारकोपर रेल्वे स्टेशन येथील सुविधां संदर्भात फक्त पत्र व्यवहार होत होता. पाण्याची व्यवस्था सुरळीत नसल्यामुळे तेथील शौचालये बंद आहेत. त्याचा त्रास रेल्वे प्रवाशांना सहन करावा लागत होता. हा विषय शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि पनवेल महानगरपालिकेचे मा.विरोधी पक्षनेते श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांना आम्ही उलवेकर मित्र मंडळ आणि रेल्वे प्रवाशांनी सांगितला त्यासोबतच इतर समस्या सुद्धा त्यांच्यासमोर मांडल्या होत्या.
त्यावर कार्यवाही म्हणून त्वरित उलवे परिसरातील पाण्याची समस्या आणि इतर सिडकोची अपुरी विकास कामे यासंदर्भात समस्या निवारणासाठी त्यांनी रायगड भवन येथे संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यातून सकारात्मक निर्णय झाले त्यावर त्यांना त्वरित कार्यवाही करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. त्यानुसार सिडको ने कार्यवाही केली आहे. बामणडोंगरी आणि खारकोपर रेल्वे स्टेशन येथील पाण्याच्या कनेक्शन अभावी बंद असलेले शौचालय आज पाणी जोडणी झाल्यामुळे पुन्हा सुरू करण्यात आले आणि रेल्वे प्रवाशांना विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *