रविवार ७ जुलै रोजी कामोठे येथे होणार वातानुकूलित शवपेटीचा लोकार्पण सोहळा…

रविवार ७ जुलै रोजी कामोठे येथे होणार वातानुकूलित शवपेटीचा लोकार्पण सोहळा…*

कामोठे (प्रतिनिधी )पनवेल आणि नवीमुंबई परिसरातील लोकप्रिय असे 4K Digital न्युज चॅनल चे साप्ताहिक वृत्तपत्र गौरव दर्शन तर्फे रविवार दिनांक ७ जुलै २०२४ रोजी कामोठे येथे एक आगळा वेगळा उपक्रम राबवत आहे. एखाद्या घरी कोणा व्यक्तीचे निधन झाले त्यांच्या साठी वातानुकूलित शवपेटी म्हणजेच (Mourtary Freezer Box ) या वस्तूचा उद्घाटन सोहळा आयोजित केला आहे
उद्देश : जेव्हा व्यक्तीचे निधन होते तेंव्हा त्यांचे नातेवाईक परदेशी, गावी किंवा दूर असतात त्यामुळे त्यांना येण्यास उशीर लागतो तोपर्यंत त्या मृत व्यक्तीच्या पार्थिवाचे विघटन सुरू होते व वास येण्यास चालू होतो म्हणून इतर नातेवाईक त्या व्यक्तीचे लवकर अंतिम संस्कार उरकतात व दूरचे नातेवाईक त्यांचे दर्शन घेऊ शकत नाही व ही हूरहुर आयुष्यभर राहते त्या साठी या वातानुकूलित शवपेटी चां लोकार्पण सोहळा आयोजित करत आहोत याची सेवा कामोठे ,खारघर, कळंबोली आणि पनवेल परिसरातील नागरिकांसाठी नाममात्र दरात ही सेवा देणार आहोत. तरी नागरिकांनी या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहावे संपादक गौरव जहागीरदार यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *