पनवेल येथील शासकीय विश्रामगृहात वंचित बहुजन आघाडीच्या पनवेल महानगराच्या सर्व कमिटीची सहविचार सभा संपन्न

पनवेल प्रतिनिधी :-दिनांक 7 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पनवेल येथील शासकीय विश्रामगृहात वंचित बहुजन आघाडीच्या पनवेल महानगराच्या सर्व कमिटीची सहविचार सभा संपन्न झाली ही सभा पनवेल महानगराचे अध्यक्ष डी डी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहराच्या वतीने आयोजित करण्यात आली होती त्याच अनुषंगाने पनवेल महानगरामधील पनवेल शहर, खांदा कॉलनी, कामोठे, न्यू पनवेल, कळंबोली ,नावडे अशा सर्व विभागातील अध्यक्ष व त्यांची सर्व कमिटी उपस्थित होते या बैठकीमध्ये पनवेल शहराच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली त्यामध्ये प्रामुख्याने
1) “घर तिथे कार्यकर्ता” अशी संकल्पना पनवेल शहराचे महासचिव अविनाश अडागळे यांनी मांडली.
2) पनवेल शहरातील महिलांच्या समस्येवर भर देण्यात आला. उदा. विधवा पेन्शन, घरकाम करणाऱ्या महिलांना कमी मानधन मिळते त्यावर उपाययोजना आखणे.
3) पनवेल शहर, नवीन पनवेल, कामोठे, पाणी समस्यावर पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त आणि सिडको अधिकारी यांच्याशी भेटून पाण्याचा प्रश्न सोडविणार.
4) पनवेल महानगरातील तलाव, ओढा किंवा डबक्यात साचलेल्या पाण्यामध्ये डेंग्यू आणि मलेरिया सारखे डास निर्माण होतात अशा डासाची निर्मिती होऊ नये यासाठी पनवेल महानगर पालिकेने उपाययोजना कराव्या.
5) पनवेल महानगरातील पनवेल शहर, कळंबोली, नवीन पनवेल, कामोठे अशा विविध भागांमध्ये पाणी तुंबले, स्मार्ट सिटी बनत असलेले शहरात असे घडत असेल तर ही खूप मोठी शोकांतिका आहे. यावर लवकरच अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे.
6) “प्रबुद्ध भारत” हे पाक्षिक वृत्तपत्र ४ फेब्रुवारी १९५६ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी याची स्थापना करून आपले विचार समाजात पोचावे यासाठी हे वृत्तपत्र काढले परंतु अलीकडच्या आधुनिक युगात हे वृत्तपत्र दिसेनासे झाले याचाच विचार बैठकीत घेतला या वृत्तपत्रचे संपादक श्रद्येय ऍड. बाळासाहेब आंबेडकर आहेत व त्यांचे विचार या वृत्तपत्र: मार्फत पनवेल महानगरातील प्रत्येक घराघरात पोचवण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली. आलोक कांबळे यांची समितीच्या अध्यक्षपदी निवड करून त्यांची टीम हे कार्य करेल.
7) येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका, स्थानिक स्वराज्य पातळीवरील निवडणुका तोंडावर आल्या आहेत त्यासाठी वंचित बहुजन आघाडी ताकदीने ही निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न शील राहणार आहे.
“अपयश ही यशाची पहिली पायरी असते” अश्या सुविचाराप्रमाने तयारी करणार आहे.
8) पनवेल शहरातील मतदारांनी या वेळी विचारपूर्वक मतदान करावे अन्यथा पुन्हा पुढची पाच वर्षे अशीच हाल अपेष्टा सहन कराव्या लागतील असे आवाहन डी डी गायकवाड यांनी केले. यावेळी पनवेल महानगराच्या सर्व कमिटी त्यामध्ये पनवेल महानगराचे अध्यक्ष डी डी गायकवाड, महासचिव संतोष मुजमुले, कोषाध्यक्ष विजय घोबाळे, पनवेल शहराचे महासचिव अविनाश अडागळे, पनवेल शहर सचिव, प्रा. चंद्रकांत नवगीरे सर, पनवेल शहर संघटक शशिकांत कळवेकर, महिला अध्यक्षा अमिना दीदी शेख, पनवेल महानगराच्या अध्यक्षा डॉ छाया शिरसाट, रजिया मुल्ला, कामोठे शहर अध्यक्ष महेंद्र जाधव असूर्डेकर, कामोठे संघटक एस वाय लोखंडे, जनार्दन कांबळे, कळंबोली शहर अध्यक्ष सतीश अहिरे, उपाध्यक्ष भारत प्रधाने, नवीन पनवेल अध्यक्ष शिवाजी साळवे, महासचिव किरण सोनवणे, दिलीप भंडारे, नामदेव शेळके, जितेंद्र घोलप, प्रदीप कदम, आलोक कांबळे, एकता ताई जाधव, रेणुका कांबळे, वर्षा शेख, रागिणी कांबळे, शमीन शेख, मंदा जाधव, नंदा जाधव, आशा लवांडे, कविता पवार, कमला झिरे, सुवर्णा तायडे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *