बीमा व्यापारी संकुल निवडणुकीत रामदास शेवाळेंच्या ऐकता पॅनल चा दणदणीत विजय

बीमा व्यापारी संकुल निवडणुकीत रामदास शेवाळेंच्या ऐकता पॅनल चा दणदणीत विजय
पनवेल ता.8(बातमीदार) आशिया खंडातील सर्वात मोठ्या लोखंड पोलाद बाजारातील संपूर्ण देशात ट्रान्सपोर्ट हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या बिमा व्यापारी संकुलाची निवडणूक दोन सत्र बिनविरोध झाली होती. परंतु या वेळी निवडणूक लागल्याने बिमा एकता पॅनेल व बिमा विकास पॅनेल यांच्यात लढत झाली. या निवडणुकीत रामदास शेवाळे यांच्या बिमा एकता पॅनलने 19 पैकी 19 जागा जिंकून बिमा विकास पॅनलचे यांचे दणदणीत पराभव करुन एकहाती बहुमत मिळविले आहे. मुंबईतील नामांकित मोठ्या स्टील व्यापाऱ्यांसह तब्बल 692 सदस्य असलेल्या सोसायटीच्या निवडणुकीचा प्रचार मुंबईपर्यंत सुरू होता. मुंबई मधील व्यापारी निलेश पारिख व प्रशांत पारिख यांनी बिमा एकता पॅनेल साठी कंबर कसली होती. पंधरा वर्षे या सोसायटीचे अध्यक्ष असलेले रामदास शेवाळे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख असल्याने या निवडणुकीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले होते. तसेच विरोधी पॅनेल ने कळंबोलीसह पनवेल मधील महाविकास आघाडीचे सर्व नेते बिमा काॅम्पलेक्स च्या बुथवर ठाण मांडून होते. या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार रामदास वामन शेवाळे, नारायण पोपट फडतरे, नवनाथ वनवे, आबासो लकडे, पुण्यवंत खटकाळे, वसंत जाधव, चंद्रकांत बागल, विजय घोघरे, मनोज मिश्रा, जयेश पार्टे, नारायण आमृले, पंचनारायण साहु, कुलदिपसिंग विरदी, किशोरीलाल शर्मा, सपना कसले, जानकी गिरी, शैलेश म्हात्रे तर बाळासाहेबे येळे व भानुदास खोडेवार हे बिनविरोध निवडून आले होते. रामदास शेवाळे प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्रीकांत (आप्पा) फाळके, ऑड. श्रीनिवास क्षीरसागर, सचिन सपकाळ, महेश गोडसे तुकाराम सरक, निलेश दिसले,संजय शेडगे, प्रितम गोरड, प्रेम डांगे, नारायण पिलाणे, संतोष बागल या सभासदांनी निवडणूकीची धुरा सांभाळली होती. निवडणुक अधिकारी म्हणून शीतल संजू दहिफळे यांनी काम पाहिले. कुठलेही गालबोट न लागता निवडणूक निर्विघ्न पार पाडल्याबद्दल निवडणूक अधिकार्यांनी सर्व उमेदवारांचे आभार मानले. सर्व विजयी उमेदवारांचे पनवेल परिसरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *