वृक्षारोपणाचे आयोजन करीत सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ, पनवेल रायगड व मुंबई विभाग कार्यकारिणी घोषित

वृक्षारोपणाचे आयोजन करीत सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ, पनवेल रायगड व मुंबई विभाग कार्यकारिणी घोषित

पनवेल प्रतिनिधी
श्री विलास पुंडले शब्दवेल साहित्य संघ,पनवेल (नोंदणीकृत) द्वारा मुख्य कार्यकारिणीच्या दिनांक 17 जून 2024 रोजी झालेल्या ठरावानुसार आज रायगड जिल्हा व मुंबई विभाग कार्यकारिणी स्थानिक सिडको गार्डन येथे वृक्षारोपणाचे आयोजन सकारात्मक संदेश देत घोषित करण्यात आली. यामध्ये रायगड कार्यकारिणी साठी सौ. प्रतिभा मंडले-अध्यक्ष श्री. मनोज उपाध्ये -उपाध्यक्ष सौ.प्रितम माने-सचिव श्री.नवनाथ माने-संघटन प्रमुख
सौ. माधवी मोतलिंग-महिला संघटन प्रमुख
तर कार्यकारिणी सदस्य म्हणून महेंद्र सूर्यवंशी,दिलीप जोशी,चित्रलेखा जाधव व सौ. गीता रक्ताडे व मुंबई व नवी मुंबई विभाग कार्यकारिणी साठी सौ. छाया सुभाष वांगडे, तर सचिव पदी जयश्री चौधरी,उपाध्यक्षा म्हणून शिल्पा चऱ्हाटे सल्लागार पदी निलूताई मानकर व संघटन प्रमुख म्हणून गौरी शिरसाट तर सदस्य म्हणून अंजना कर्णिक यांची 31 मार्च 2027 पर्यंत आगामी तीन वर्षांसाठी सर्वानुमते निवड करण्यात आली.
याप्रसंगी छोटेखानी कविसंमेलनामध्ये पावसासह वारी, विठ्ठल, बाप यांसारख्या विविध विषयावर काव्य सादर करीत उपस्थित कवींनी कविसंमेलन गाजवले.
नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांनी शब्दवेलचे स्थानिक पातळीवर जास्तीतजास्त राबविण्याचा निश्चय केला.याप्रसंगी शब्दवेलचे पहिले आजीवन सभासद म्हणून खजिनदार देवेंद्र इंगळकर यांनी पाच हजार पन्नास रुपयांचा धनादेश संस्थेला सुपूर्द केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिव सौ. अश्विनी अतकरे, सहसचिव रामदास गायधने, खजिनदार देवेंद्र इंगळकर, केंद्रिय प्रसिद्धी प्रमुख विलास पुंडले,मुख्य कार्यकारिणी सदस्या योगिनी वैदू यांनी प्रयत्न केले. शब्दवेलच्या सर्व उपक्रमांमध्ये जास्तीतजास्त साहित्यिकांनी सहभागी होण्याचे विनम्र आवाहन अध्यक्ष प्रविण बोपुलकर यांनी केले आहॆ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *