*भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा ७७ वा वर्धापन दिन जल्लोषात साजरा*
“पनवेल-उरण मतदार संघात बाळाराम पाटील आणि प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्याच नावाची चर्चा”
शेतकरी, बहुजन कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी सन्मानासाठी कटिबद्ध होऊया.. संकल्प आपला पुन्हा एकवार दृढ करूया.. या संकल्पनेतून भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा ७७ वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या दिमाखात लोकनेते स्व. दि बा पाटील साहेबांच्या जन्मभूमी उरण जासई या ठिकाणी १ ऑगस्ट रोजी हजारोंच्या संख्येने उपस्थित लाल बहाद्दरांच्या निष्ठावंतांच्या सहभागाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात वर्षभरात स्वर्गवासी झालेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. अक्षता म्हात्रे आणि यशश्री शिंदे यांच्या घडलेल्या निर्घृण हत्याकांडाबद्दल जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर उरण तालुका विभागीय पदाधिकाऱ्यांची घोषणा मोठ्या जल्लोषात कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
1 ऑगस्ट रोजीच्या जासई येथील वर्धापन सोहळ्यात मा.आमदार विवेकानंद पाटील यांच्या जामीन अर्जावर मंजुरी मिळाल्याची घोषणा होताच पदाधिकारी व कार्यकर्त्या मध्ये प्रचंड उत्साह पहायला मिळाला. ढोल ताशे, फटाके वाजवून मेळाव्यात जोरदार घोषणाबाजी करत आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
या वेळी मा.आमदार बाळाराम पाटील, रायगड जिल्हा परिषद मा.अध्यक्ष आस्वाद पाटील, मा.नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, प्रमूख वक्त्या म्हणून सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष सदस्या विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या संघर्ष योध्दा प्रतिभाताई परदेशी, मा.सभापती काशिनाथ पाटील, कृ.उ.बा.स. सभापती नारायणशेठ घरत, पनवेल महानगरपालिका मा.विरोधी पक्ष नेते प्रितम जनार्दन म्हात्रे, मा.कृ.उ.बा.स. सभापती राजेंद्र पाटील, जिल्हा चिटणीस गणेश कडू तसेच उरण, पनवेल येथील जिल्हा, तालुका स्तरावरील हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते व पक्ष निष्ठावंत सदस्य मोठ्या संख्येने वर्धापन दिनाच्या सोहळ्यात सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी पनवेल-उरण मतदार संघ शेकापचा असे म्हणत मा. आमदार श्री.बाळाराम पाटील आणि मा.विरोधी पक्ष नेते पनवेल महानगरपालिका प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या नावाची जोरदार चर्चा ऐकण्यात आली.
*कोट*
आपल्या शेतकरी कामगार पक्षाची नवीन पिढी आपल्या व्यासपीठावरील सर्व नेत्यांचा आदर्श घेऊन पुढे येत आहे . सामाजिक क्षेत्रात काम करत असताना रोजगार ,आरोग्य, शासकीय योजना राबवणे, महिला सक्षमीकरण या क्षेत्रात आम्ही मुख्यत्वे करून काम केले आहे आणि भविष्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात काम करण्याचे आमचे नियोजन आहे. भविष्यात येणाऱ्या दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळात रोजगार संदर्भात आम्ही एक वर्ष अगोदरपासूनच विविध रोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे जेणेकरून तरुणांना भविष्यात तेथे नोकरीची संधी सहज उपलब्ध होईल.
श्री. प्रितम जनार्दन म्हात्रे
(खजिनदार, शेकाप रायगड)