हास्य कविसंमेलनाचे आयोजन
पनवेल प्रतिनिधी :-
मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगाव (साहित्य शाखा) व सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ, पनवेल (कार्यक्षेत्र महाराष्ट्र)यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २१सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी २:०० ते ५:०० या वेळेत निमंत्रितांच्या हास्य कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहॆ. या कविसंमेलनामध्ये नितीन वरणकार(शेगाव-बुलढाणा), प्रा. संजय कावरे (मंगरूळपीर-वाशिम), प्रवीण सोनोने (दारव्हा-यवतमाळ), प्रा.महादेव लुले(तिवसा-अकोला), अमोल चरडे(पुणे), प्रवीण बोपुलकर (पनवेल) हे कवी आपल्या कविता सादर करतील याप्रसंगी ‘महाराष्ट्राचा हास्य कवी स्पर्धा २०२४’ या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रमसुद्धा संपन्न होणार आहे. कार्यक्रमास जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्याध्यक्षा प्रा. उषा तांबे, प्रमुख कार्यवाह डॉ. अश्विनी भालेराव, साहित्य शाखा कार्यवाह अशोक बेंडखळे, शब्दवेल साहित्य संघाचे अध्यक्ष प्रवीण बोपुलकर व सचिव अश्विनी अतकरे यांनी केले आहॆ.
विलास पुंडले
केंद्रीय प्रसिद्धी प्रमुख
सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ पनवेल